मन्दिरों में शंख बाजे, मस्जिदों में हो अज़ान
शेख का धर्म और दीन ए बरहमन आजाद है
अब कोई गुलशन ना उजड़े अब वतन आजाद है
आपकी कुर्बानी को नमन . . .
भारतमातेच्या सुपुत्रांना सलाम
सैनिक… भारतमातेचे शूर सुपुत्र. सैनिक देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. त्यांच्यामुळे आपण आपलं आयुष्य सुखाने जगू शकतो. ज्यांचा आपल्या सर्व भारतीयांना अभिमान आहे ते सैनिक देशाच्या सीमेवर आपलं रक्षण करतात. आपल्या जीवाची बाजी लावून लढाई करणारे सैनिक यांना आपण योग्य तो मानसन्मान मिळून देतो का? तर याचं उत्तर नाही आहे…
होय, देशासाठी बाजी लावणाऱ्या सैनिकाला जो मान-सन्मान द्यायला पाहिजे, तो आपण देत नाही. सैनिकांप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव, कोणी सांगून नव्हे, तर आपल्या मनातून यायला हवी. सीमेवर लढताना मागे आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायला लाखे-करोडो बांधव आहेत, अशी सुरक्षिततेची भावना आपण जवानांमध्ये निर्माण करायला हवी. २४ तास, ३६५ दिवस काम करणाऱ्या, ज्यांच्यासाठी देशासाठी प्राधान्य सर्वप्रथम आणि मग कुटुंब आणि मग स्वतःचा विचार असे सर्व जवान जे नेहमी देशाच्या रक्षणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशाची सेवा करतात असे सर्व जवान ज्यांनी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली अशा सर्व शहिद जवानांसाठी “युवा – तरंग सामाजिक संस्थेतर्फे ” २७ जानेवारी २०१९ रोजी शहीद जवानांना भावपूर्ण आदरांजली वाहन्यात आली