युवा – तरंग सामाजिक संस्था २०१४ सालापासून वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजेच आदिवासी बांधवांनसोबत दिवाळी साजरी करणे, गरजुना शैक्षणिक वस्तूंचे वाटप, जनजागृती मोहिमेसाठी चे विविध प्रयत्न जसे, एडस् डे च्या दिवशी जनजागृती मोहीम, बेघर लोकांना कपडे आणि खाद्य वस्तूंचे वाटप, विभागातील गरजूंना साहाय्य असे बरेचसे कार्यक्रम गेल्या सहा वर्षांपासून संस्था करत आहे …
असाच एक जनजागृतीचा प्रयत्न २६ जानेवारी २०२० रोजी ७१ व्या प्रजासत्ताक दिना दिवशी युवा – तरंग सामाजिक संस्थेतर्फे विभागात सामूहिक रित्या प्रजासत्ताक दिन निवृत्त भारतीय सैन्य अधिकारी श्री. तिवारी यांच्या शुभ हस्ते झेंडावंदन करून साजरा करण्यात आला. या प्रयत्नाना लोकांचा उत्तुंग प्रतिसाद मिळाला. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधुन ‘क्षय रोगवार’ जनजाग्रुतिपर कार्यक्रम ही सदर करण्यात आला.
असेच समाज उपयोगी कार्ये संस्थेतर्फे यापुढे ही राबविण्यात येतील.
जय हिंद जय भारत!