नमस्कार ,
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युवा तरंग सामजिक संस्था दिवाळी निमित्त शैक्षणीक कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.तर या वर्षी आम्ही गाव सासणे, तालुका मुरबाड येथील शासकीय विद्यालय मधील विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम राबविणार आहोत. या आश्रमशाळेत जवळपास ४१० विद्यार्थी आसपासच्या पाड्यांमधून येऊन शिक्षण घेत आहेत , तसेच जवळपास २९० निवासी विद्यार्थी आहेत. या शाळेला गरज असणाऱ्या वस्तू आम्ही यावेळी पुरविणार आहोत, आपल्या या समाजकार्यात आपला हातभार लागेल अशी अपेक्षा आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी,आपण नक्कीच आम्हास यासाठी सहकार्य कराल याची आम्हास खात्री आहेच.
धन्यवाद .

