हे महत्त्वाचं नाही की आपण किती देत आहोत , तर महत्त्वाचं हे आहे की आपण ते किती मनापसुन देत आहोत
– मदर तेरेसा
युवा – तरंग सामाजिक संस्था ही सन २०१४ पासून कार्यरत आहे. या संस्थेच्या उदयाची कहानी अशी की या संस्थेचे संस्थापक म्हणजेच श्री. कुणाल शिर्के इंजिनीअरिंगला असताना त्यांच्या मित्रासोबत म्हणजेच श्री. सौरभ मंगुरुळे आणि त्याच्या कुटुंबासोबत एका आदिवासी पाड्यांमध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी गेले असता त्या पाड्यामधली बिकट आणि हालाखीची परिस्थिती कुणाल याने पाहिली आणि त्याचवेळी ठरवले की आपण समाजातिल दुर्बल घटकांच्या सेवेसाठी काही ना काही तरी केले पाहिजे, त्याचवेळी त्याने त्याच्या काही सहकार्याच्या सोबतीने युवा – तरंग ची स्थपना केली.
सुरुवातीला जेमतेम चार ते पाच सभासदांनी सुरु झालेल्या या संस्थेमध्ये खूप सारे सभासद समाजाच्या सेवेसाठी आज कार्यरत आहेत. संस्थेच्या सभासदांच्या सहकार्यानेच संस्थेला तेव्हापासून खूप मोठी झेप घेता आली आणि असे खूप सारे मेहनती, धाडसी , विश्वासू आणि नेहमी समाजाचा विचार करणारे सभासद आज या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. संस्थेच्या सभासदांच्या सहकार्यानेच समाजकार्य देखील दिवसेंदिवस वाढत आहे आणि आम्हाला देखील खात्री आहे की फक्त आम्ही सभासद नव्हे तर तुम्ही सुद्धा समाजाच्या प्रत्येक वंचितांना मदत करण्यासाठी आपले सहकार्य नक्कीच दयाल.
युवा-तरंग सामाजिक सेवाभावी संस्था वेग वेगळ्या प्रकारची मदत करते जसे कि कोणाचा वाढदिवस असेल तर तो अनाथाश्रम ,वृद्धाश्रम किंवा अंधशाळेमध्ये साजरा करतो तसेच त्यांना गरजेचा वस्तू किंवा आर्थिक मदतदेखिल आम्ही पुरवतो .तसेच आम्ही दर दिवाळीला आदिवासी पाड्यामध्ये आदिवासी लोकांना कपडे फराळ , लहान मुलांना शाळेसाठी वह्या वैगरे आणि त्यांना गरजेचं ज्या वस्तू असतील त्या आम्ही दरवर्षी पुरवतो .. ..
युवा-तरंग सामाजिक सेवाभावी संस्था हि संस्था गरजू लोकांसाठी कार्यरत आहे
चला तर मग
“युवा – तरंग सोबत सक्षम समृद्ध समाज घडवूया”
|| हात कर्तव्याचा ध्यास समाज कल्याणाचा ||
It doesn’t matter how much we are giving, what matters is how much we are giving it by choice
– Mother Teresa
Yuva Tarang Samajik Sanstha has been operating since the year 2014. The story of the rise of this organization is that, the founder of the organization Mr. Kunal Shirke while in engineering Visit Tribal Village with his friend Mr. Saurabh Mangurule and his family to celebrate Diwali with tribal’s.
Kunal witnessed the difficult situation in that area and at the same time he decided that we should do something for the weaker sections of the society and with some some members he founded Yuva Taranag Samajik Sanstha.
Initially started with four to five members, many members are working today for the service of the community. With the help of the members of the organization, the organization has been able to take a huge leap ever since and there are many hard working, courageous, loyal and always minded community members working in the organization today.
Social work is also increasing day by day with the support of the members of the organization, and we are sure that not only we, but you too, will definitely give your support to help society.
Let’s go then
“Build a prosperous society capable with Yuva Tarang”